महाराष्ट्र टाइम्स
१२ डिसेंबर २०११
बाराव्या पंचवाषिर्क योजनेत संशोधनासाठी भरीव तरतूद
आरोग्य मंत्रालयात नवा संशोधन विभाग स्थापन
म. टा. प्रतिनिधी, पुणे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन त्या माध्यमातून नव्या औषधप्रणालीसह आरोग्याच्या सेवा सुविधा विकसित व्हाव्यात अशी अपेक्षा असताना संशोधनाची वानवा दिसून येत आहे. म्हणूनच मेडिकल कॉलेजला संशोधनास प्रवृत्त करण्यासाठी निधीचे 'बूस्टर' देण्यात येणार आहे.
बाराव्या पंचवार्षिक योजनेतंतहर्गत आरोग्याच्या अॅलोपॅथी, आयुष या दोन समित्यांची संयुक्त बैठक नुकतीच दिल्लीत झाली. त्या बैठकीत पंचवाषिर्क योजनेत समाविष्ट करण्यात येणाऱ्या विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.
' केंदीय मंत्रालयांतंर्गत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) धतीर्वर 'डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च' विभागाची नव्याने स्थापना करण्यात आली होती. मात्र या विभागाला स्वतंत्रपणे निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा विभागच कार्यान्वित होऊ शकला नाही. मात्र या विभागाला आयसीएमआरसारखा समान दर्जा देण्यात आला असून आरोग्य मंत्रालयात हे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार आहेत. प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त संशोधन व्हावे, त्याला चालना मिळावी या हेतूने हा विभाग स्थापन केला गेला. त्यासाठी बाराव्या पंचवाषिर्क योजनेंतर्गत भरीव निधी देण्यात येणार आहे. तसेच देशातील वैद्यकीय महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणात संशोधन व्हावे, असे अपेक्षित असताना त्याकडे महाविद्यालयांकडून दुर्लक्ष होत असल्याचे केंदीय आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये होणाऱ्या संशोधनाला वाव देता यावा यासाठी त्यांच्या संशोधनासाठी विशेष निधी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजसाठी संशोधन योजनाही राबविण्यात येणार आहे,' अशी माहिती नियोजन आयोगाच्या आरोग्य सुकाणू समितीचे सदस्य डॉ. भूषण पटवर्धन यांनी 'मटा'ला दिली.
पुढील काळात औषधे, वैद्यक सुविधा विकसित करण्यावर भर दिल्यास त्याचा फायदा नागरिकांना होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठांसह वैद्यकीय महाविद्यालयांना सशक्त करण्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औषधांच्या किंमतीवर नियंत्रण येणार?
परदेशातील औषधे खरेदी करावी लागत असल्याने ती औषधे महागडी आहेत. ती सर्वसामान्यांना खरेदी करणे अशक्यप्राय होऊ लागले. त्यामुळे अॅलोपॅथी, आयुवेर्दाच्या औषधांच्या संशोधनावर भर देण्यात येणार असून त्यातून या प्रकारच्या औषधांची निमिर्ती व्हावी, अशी अपेक्षा आहे. परिणामी औषधांच्या वाढत्या किंमतीवर बाराव्या पंचवाषिर्क योजनेत नियंत्रण आणण्यात येणार आहे.