सकाळ वृत्तसेवा
०९ फ़ेबुवारी २०११
मुंबई, भारत
राज्यातील आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये या महाविद्यालयांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वाढ अंमलात येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले अन्य निर्णय...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी चार कोटी २२ लाख रुपयांच्य़ा निधीची तरतूद करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
आयुर्वेदिक व युनानी शिक्षण महागणार
- Details
- Hits: 1956
0