Print
Hits: 2646

सकाळ वृत्तसेवा
०१ जुन २०१०
अहमदाबाद, भारत

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त गुजरातमध्ये गांधीनगरसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये "धूम्रपानविरोधी शहर' उपक्रमास आजपासून सुरवात करण्यात आली. या उपक्रमात "ब्लूमबर्ग' या संस्थेचा सहभाग आहे.

राजधानी गांधीनगरबरोबरच अहमदाबादच्या शहरी आणि ग्रामीण भागात हा उपक्रम राबविला जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कचे महापौर मायकल आर. ब्लूमबर्ग यांनी या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी पहिल्या वर्षाला पाच लाख आणि दुसऱ्या वर्षाला तीन लाख रुपये दिले आहेत. अहमदाबाद महापालिका, गुजरात कर्करोग संशोधन संस्था आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी तंबाखू सेवनाविरोधी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. देशात तंबाखूसेवनाचे पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही मोठे प्रमाण आहे. एकट्या गुजरातमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 60 टक्‍के, तर महिलांचे साडेआठ टक्के प्रमाण आहे. राज्यातील सातवी ते दहावीपर्यंतचे 27.3 टक्के विद्यार्थी तंबाखू सेवन करतात, असे एका अहवालात आढळले आहे. राज्यात दर वर्षी तब्बल एक लाख लोक तंबाखू सेवनामुळे झालेल्या कर्करोगाचे बळी जातात.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.