सकाळ वृत्तसेवा
२६ एप्रिल २०१०
तळोदा, भारत
येथील रुग्णालयात आज गॅस्ट्रोसदृश आजाराच्या आणखी सहा जणांना दाखल करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी दाखल असलेल्या 48 जणांची प्रकृना घरी पाठविण्यात आले आहे. 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ठाकरे यांनी दिली.
येथे तीन दिवसापासून गॅस्ट्रोसदृश साथीचा उद्रेक झाला आहे. त्यात आतापर्यंत 80 रुग्ण दाखल करण्यात आले. पैकी 48 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. 32 जणांवर उपचार सुरू आहेत. यात आज दाखल झालेल्या सहा जणांचा समावेश आहे. अजूनही या परिसरात कुणाला त्रास होत आहे किंवा कसे याची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
आर्थिक मदत द्या
आमलाड (बातमीदार): गॅस्ट्रोने तळोदा शहरातील एका बालकाचा मृत्यू झाला. त्याला आर्थिक मदत देण्यात यावी. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेतील संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. रुग्णांसोबतच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करावी. दूषित पाणीपुरवठा झालेल्या भागातील जलवाहिनी बदलावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर डॉ. शशिकांत वाणी, अजय परदेशी, दिलीप जोहरी, प्रल्हाद पाडवी, मोहन ठाकरे, भगवान मगरे आदींची नावे आहेत.
तळोदा रुग्णालयात आणखी सहा गॅस्ट्रोग्रस्त दाखल
- Details
- Hits: 2912
0