सकाळ वृत्तसेवा
२० जुलै २०१०
मुंबई, भारत
योग्य उपचारांअभावी, मुदतीपूर्व प्रसूती झालेल्या बाळाची दृष्टी गेल्याचा आरोप ठेवून बोरिवलीतील आकाश श्रीधरानी यांनी दोन डॉक्टरांविरुद्ध महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली आहे.
बोरिवलीच्या क्रिस्टल रुग्णालयात, तीन वर्षांपूर्वी श्रीधरानी यांच्या पत्नीची मुदतपूर्व प्रसूती होऊन मुलगी झाली. या वेळी डॉ. शर्मिला मल्या यांनी उपचार केले. त्यानंतर आनंद नर्सिंग होमच्या डॉ. पवन सुरेखा यांनी उपचार केले. मात्र मुदतपूर्व प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळाच्या बाबतीत जी काळजी डॉक्टर या नात्याने घेणे आवश्यक होते ती न घेतल्यामुळे "आस्था'ची दृष्टी गेली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बोरिवली महानगर दंडाधिकारी जी. पी. शिरसाट यांनी दोन्ही डॉक्टरांना समन्स बजावले होते. तूर्तास दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने बालिकेने दृष्टी गमावली
- Details
- Hits: 1988
0