चेन्नई येथे झालेल्या वै. सेमिनार मध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, सागरी अन्न हे भारतातील पौष्टीक अन्नाची गरज भागवत आहे. मदुराई कामराज महाविद्यालयाचे प्रो.टी.जे. पांडीयन यांना असे वाटते की गरीब भारतीय लोकांचे मासे हे मुळ पौष्टीक व गरजेचे अन्न आहे. जेव्हा ते ‘मासेमारी व समुद्री उद्योगाचे पौष्टीक आहार यांचे संरक्षण’ या सेमिनार मध्ये बोलत होते. ते म्हणाले निर्बल विभागात गरीब जनतेसाठी चांगल्या दर्जाचे मासे माफक दरात दिले गेले पाहीजे.
१९९९ मध्ये भारतातील मासेमारी उत्पादन हे ५ दशलक्ष होते. हे असे दर्शविते की भारतातील दशलक्ष लोक मासेमारी व त्याला अनुसरून असलेल्या सागरी उद्योगावर अवलंबुन होते.
कृषितज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी असे स्पष्ट केले आहे की बायोव्हयाली निर्माण केल्याने गरीब स्त्रीयांना सागरी व्यवसाया बाबत ज्ञान व सागरी उत्पादन वाढविण्या बाबत प्रशिक्षण मोफत दिले तर सागरी उत्पादनात वाढ होईल, हे प्रशिक्षण मासेमारी करणार्या कोळी बांधवांना मासेमारी व्यवसायाचे संवर्धन करण्यास मार्गदर्शक ठरेल. स्वामिनाथन पुन्हा म्हणाले ‘मस्य उद्योगात संवर्धन होण्यासाठी/उत्पादन वाढविण्यासाठी योग्य धोरण आखणे गरजेचे आहे. एक जातीच्या मास्यांचे उत्पादन, एकत्रित मासेमारी उद्योगाचे संवर्धन आणि पर्यायी सागरी आहार वाढविण्यासाठी योग्य माहिती विषयक कार्यक्रम व त्याची प्रस्तावना करून दिली पाहिजे.
भारतीयांचे सागरी अन्न हे एक पौष्टीक दृष्ट्या चांगले व गरज पूर्तीचे साधन आहे.
- Details
- Hits: 3699
0