सकाळ वॄत्तसेवा
१० जून २००९
रुबी हॉल क्लिनिकच्या कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरतर्फे येत्या रविवारी म्हणजे १४ जून २००९ रोजी जठर कर्करोगावर राष्ट्रीय स्तरावर परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती "सेंटर फॉर ऍडव्हान्स गॅस्ट्रोइंटेस्टिनल ऑनकॉलॉजी"चे मुख्य वैद्यकीय कर्करोग तज्ञ डॉ. मनीष जैन यांनी दिली. ते म्हणाले,"सर्वोत्तम उपचार पद्धती कोणती, या बाबत या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातून तीनशे कर्करोगतज्ञ सहभागी होणार आहेत." डॉ. गजानन कानिटकर म्हणाले, "सेंटर फॉर ऍडव्हान्स गॅस्ट्रोइंटेस्टिनल ऑनकॉलॉजी म्हणजे सी.ए.जि.ओ.तील वैद्यकीय तज्ञांनी प्रगत देशात जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. येथील परिचारिकांनाही स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले आहे."
जठर कर्करोगावर रविवारी पुण्यात परिषद
- Details
- Hits: 3085
0