
सामाजिक शांतता प्रस्थापित करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्यकडे पुर्णतः दुर्लक्ष होत असल्यामुळे पोलीस महासंचालक शिवानंद यांनी नुकतीच पोलीस कर्मऱ्यांसाठी पोलीस स्टेशनच्या आवारातच व्यायाम शाळा उभारण्याची घोषणा केली.
पोलीस कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यासाठी ’अवेअरनेंस ट्रेनिंग प्रोग्राम’ सुरू केला आहे. त्याचा भाग म्हणून पो. उपायुक्त अनंत रोकडे यांच्या पुढाकाने पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शरीर व मनाचे स्वास्थ या स्वास्थ या विषयांवर योगशिक्षक दत्ता कोहिनकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी आहार, विहार व व्यायाम महत्व सोदाहरण पटवून दिले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ९० टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित असंताना सारा निसर्गसंसार हा मानवी मनाचा खेळ आहे. सामाजिक शांतता प्रस्थापित करताना पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःची शांती गमवायाची नसेल तर सर्वजणांनी मनाचा व्यायाम (ध्यान) करावा, असे आवाहन त्यांनी केले व शास्त्रोक्त विपश्यना ध्यानपध्दतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. १० दिवसांचे हे निवासी शिबीर पूर्णपणे विनामुल्य असून यसाठी राज्य सरकारने १४ दिवसांची परावर्तित रजा मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
कोर्स इनचार्ज पी.एस.आय. भोसले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राखीव पोलीस निरीक्षक वसंत सावंत, प्रशिक्षक हणमंत शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Source:Pune Nagri