
जीवन हे खालील चार पूरक भागांचे बनलेले आहे अशी चरकाचार्यांनी म्हटले आहे.
- शरीर: मानवी शरीराचे स्वरूप
- इंद्रिये: ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मोंद्रिये
- सत्व: मान, मानसिक स्वरूप
- आत्मा: सगळयात महत्त्वाचे पण दुर्लक्षित राहिलेले स्वरूप
जे या चार भागांना जोडते त्याला प्राण असे म्हणतात. म्हणून एखाद्या भागाला जर काही झाले तर त्याचा परिणाम इतर तीन भागांवर होतो. जागतिक आरोग्य परिषदेने WHO ने ( World Health Organization ) आरोग्य म्हणजे ‘नुसते रोगरहित शरीर असणे नव्हे तर त्याचबरोबर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थिती चांगले असणे म्हणजे आरोग्य,’ अशी व्याख्या केली आहे. आयुर्वेद एक पाऊल पुढे आहे, त्यात म्हटले आहे की त्रिदोष, सात धातू, तीन मल, अग्नी आणि ज्ञानेंद्रियांचा समतोल, मन आणि आत्मा यांचा समतोल कायम राखणे म्हणजे आरोग्य.’ म्हणून ही प्रोत्साहक स्थिती आहे आणि स्वस्थ राहण्यासाठी कार्यरत रहाते.
कोणीही आपले आरोग्य गृहीत धरू नये आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये असे या व्याख्येवरून लक्षात येते. आपण रोगांचे शारीरिक, मानसिक, असे वर्गीकरण करू शकतो. नेहेमी जर आपण ऋतुमानाप्रमाणे आहार घेतला तर स्वस्थ राहू.