क्रिडाप्रशिक्षण व स्नायूंची ताकद
लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले, मुली, या सर्वांच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये, योग्य प्रमाणांत दिल्या गेलेल्या वेट ट्रेनिंग मुळे लक्षणीय वाढ खाल्याचे सिध्द झाले . एरोबिक- ऍन- एरोबिक, ट्रेनिग एकत्रितपणे दिल्यास ११ ते १५ वर्षे वयोगटातील खेळाडूंच्या स्नायूंमध्ये क्रिएरिन फॉस्फेट, एटीपी, आणि ग्लायकोजेनच्या प्रमाणात विलक्षण वाढ झाल्याचे सिध्द झाले आहे. तसेच उड्या मारणे, चेंडू फिकणे, २००-४०० मीटर्स धावणे, वल्हवणे , ह्या सारख्या व्यायाम प्रकारांनी स्नायूंमधील ग्लायाकोजनचे विघटन करणार्या फॉस्फोफ्कटो कायनेज, या फेनक द्रव्यामध्ये, वाढ झालेली दिसून आले आहे. क्रिडा प्रशिक्षणांमुळे जलद धावण्यामधील सुधारणा, ही, पळण्याच्या स्नायूंनी उपलब्ध उर्जेचा काटकसरीने केलेला वापर रनिंग इकॉनॉमी व शैलीमधील (स्टाईल), परिपूर्णतेमुळे झालेली असते. क्रिडा प्रशिक्षणामुळे, लहान मुलांमध्ये , शारीरिक वाढीबरोबरच, स्नायूंच्या एकत्र सुसूत्रपणे हालचाली करण्याच्या क्षमतेमध्ये व तोल सांभाळण्याच्या कौशल्यामध्ये लक्षणीय प्रगति झाल्याचे सिध्द झाले आहे.
क्रिडा प्रकार व त्यासाठीचे क्रिडाप्रशिक्षण सुरू करण्याचे आदर्श वय
क्रिडा प्रकार | वय (वर्षे) |
ऍथलेटिक्स हॉकी बास्केटबॉल बॉक्सिंग कॅनोईंग सायकलिंग फुटबॉल जिम्नॅस्टिक हॅण्डबॉल बर्फावरील हॉकी रोईग स्काईग पोहणे टेबलटेनिस टेनिस व्हॉलीबॉल वॉटरपोलो वजन उचलणे कुस्ती रग्बी |
११ १० १३ १५ ११ १४ १० ११ ११ १० १० ११ ८ ८ १० ११ १२ १५ १२ १० |
टॅलेन्ट स्पॉटींग - लहान वयातील असामान्य खेळाडूचा शोध
लहान वयात, खेळामधे असामान्य गुणवत्ता असणार्या अत्युच्च दर्जाच्या, स्पर्धात्मक क्रिडाप्रकारांमध्ये भाग घेणार्या, बाल खेळाडूंना योग्य ती पोषक परिस्थिती, खेळासाठी दर्जेदार प्रशिक्षणाची सोय, उत्तम दर्जाच्या खेळाच्या साधनांची उपलब्धता , उत्तम जीवनपध्दती, डावेधक शास्त्रातील, खेळांमधील, उत्तम तज्ञांचे मायेचा ओलावा असणारे, जिव्हाळ्याचे मार्गदर्शक मिळणे, अतिशय आवश्यक आहे.
असामान्य खेळाडू होण्यासाठी , बालक्रिडापटूमध्ये क्रिडा वेधक शास्त्राच्या दृष्टिकोनातून खालील गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत.
- शारीरिक तन्दुरूस्ती, निरोगीपणा
- शरीराची ठेवण
- हालचालींमधील सुसूत्रपणा, उत्तम कार्यक्षमता
- मानसिकता
अनुवंशिकता आणि असामान्य गुणवत्ता
बुध्दिमान, उच्च दर्जाच्या खेळाडूंची मुले ही सुध्दा, तशाच दर्जाचे उत्तम खेळाडू होतीलच याला कोणताही शास्त्रीय सिध्द झालेला पुरावा उपलब्ध नाही. पालकांचा प्रभाव हा केवळ, शारिरीक ठेवण, मानसिकता, कार्यक्षमता किंवा खेळास पूरक अशी कौंटुंबिक परिस्थिती इथपर्यंतच मर्यादित असू शकते. ७ वर्षांच्या मुलांवरील, स्नायूंमधील चिकाटी, गतिमानता व ताकदीच्या व्यायामांवरील प्रयोगांद्वारे हे सिध्द झाले आहे कि, १२ मिनिटे धावणे, पुढे वाकणे, या प्रकारांमध्ये, मुलांच्या स्नायूंवर वडिलांचा प्रभाव अधिक असून, मुलींमध्ये, १२ मिनिटे धावणे, ५० मीटर धावणे व पाठीच्या स्नायूंची ताकद, ह्यावर आईचा प्रभाव अधिक असल्याचे आढळून आले आहे.
शास्त्रीय चाचण्यांद्वारे हे सिद्ध झाले आहे, कि हजारात फ़क्त एका मुलामधे आंतरराष्ट्रीय दर्जाचा, दीर्घ पल्ल्याचा धावपट्टू होण्याची क्षमता असते. तर २००० मुलांमधील फ़क्त एकामधे अत्युच्च दर्जची , प्राणवायू शोशन करण्याची क्षमता ( vol max upto 86/min/kg) अनुवंशिकतेने येते. अशा प्रकारे गतिमानता, ताकद, शारीरिक कार्यक्षमता, तोलसांभाळणे, ह्या गोष्टींसाठी देखिल अनुवंशिकता प्रामुख्याने कारणीभूत असते.
असामान्य गुणवत्ता असलेल्या बाल खेळाडूस द्यावयाचा सल्ला
अशा खेळाडूंना, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून, कमीत कमी पदवीधर तरी होणे योग्य ठरते. त्यामुळे दैदीप्यमान खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यावर देखील, त्यास पर्यायी कारकीर्द उपलब्ध होऊ शकते. अशा खेळाडूंचा शालेय जीवनातील वेळ, प्रामुख्याने , क्रिडाप्रशिक्षकाच्या बालक्रिडापटूमध्ये तीव्र मानसिक गुंतवणूक असणार्या पालकांच्या सान्निध्यात व त्यांच्या सल्लानुसार वागण्यात जातो. त्यामुळे ही मुले, भावनिकरित्या खुजी राहून, आयुष्यातील साधे साधे निर्णय घेण्यास देखील, असमर्थ बनतात. या बुध्दिमान खेळाडूंना कला, शालेय शिक्षण, संगीत, ह्यासारख्या खेळ सोडून इतर, विविध क्षेत्रांच्या संपर्कात आणून, खेळाच्या पलीकडे देखील, आयुष्यात बर्याच काही गोष्टी, तितक्याच महत्वाच्या आहेत, ह्याची जाणीव करून द्यायला हवी.