श्वासोच्छ्वासाचे आणखी काही उपयोगी व्यायाम प्रकार
एका खोल भांड्यात किंवा ग्लास मध्ये पाणी घेऊन चित्रात दर्शविल्याप्रमाणे त्या पाण्यात नळकांड्याच्या साह्याने (स्ट्रॉच्या साह्याने) तोंडाने फुंकून दीर्घ काळापर्यंत अधिकाधिक बुडबुडे निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
ऍलर्जी अस्थमा हॉस्पिटलमध्ये रेस्पीरेटर लेबॉरिटी तर्फे खास तयार करवून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीने लंग व्हायटलायझर द्वारे नियमित व्यायाम करावा. टेबलाच्या पृष्ठभागावर एखादी घरंगळणारी हलकीशी वस्तु ठेवून (उदा. टेबलटेनिसचा चेंडू) ती वस्तू नाकावाटे बाहेर सोडणार्या श्वासाच्या साह्याने जास्तीत जास्त दूरवर घरंगळत जाईल असा प्रयत्न करावा.
डॉ. रमेशचंद्र माहेश्वरी यांनी अस्थमावर विविध प्रकारे संशोधन करून हे ‘लंगव्हयटलायझर’ नावाचे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचा उपयोग प्रामुख्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करण्यासाठी होतो. याच्या साह्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम केल्यास फुप्फुसाची दीर्घ श्वासोच्छ्वास करण्याची क्षमता वाढते. तसेच रूग्णाच्या श्वसनात स्थिरताही येते. हे उपकरण व ते कसे वापरावे या विषयी माहिती डॉ. माहेश्वरी यांच्याकडे उपलब्ध आहे.
प्राणायाम व योगासने करण्याआधी करावयाच्या महत्वाच्या शुध्दी क्रिया येथे देत आहोत.
नेतीक्रिया
(नाकाच्या आतील स्वच्छता राखण्याची पध्दती) प्रणायमाचा संबंध प्रत्यक्ष नाकाशीच असल्यामुळे त्याची स्वच्छताही अधिक महत्वाची आहे. नेतीक्रियेचे विविध प्रकार आहेत पण त्यापैकी दम्याच्या रूग्णासाठी जलनेती क्रियाच अधिक फलदायी ठरते.
जलनेती
नावावरून यात पाण्याचा वापर केला जातो हे लक्षात येते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या एका भांड्याचा उपयोग केला जातो. (नेती कप, नझल कफ) ह्या नेतीकपात कोमट पाणी घेऊन त्यात चिमुटभर मीठ घालावे. भांडे उजव्या हातात धरावे. भांड्याचे छिद्र असलेले नळकांडे उजव्या नागपुडीत घालून डोके थोडे मागल्या बाजूला वाकवून थोडे डावीकडे झुकावे. श्वासोच्छवास नाकाऐवजी तोंडाने करावा. पाणी उजव्या नाग्पुडीतून जाऊन आपोआपच डाव्या नागपुडीतून बाहेर पडते. अशाच प्रकारे दुसर्या बाजुनेही करावे.
नौलीक्रिया (उद्दीयान)
ही पोटाशी संबंधित क्रिया आहे. दोन्ही पायात १ मीटर अंतर ठेऊन उभे रहावे, दोन्ही हाताचे तळवे मांडीवर ठेऊन समोरच्या दिशेने थोडे वाकवावे. पोटाचे स्नायु आतमध्ये आकुंचन पावतील अशा प्रकारे बाहेर श्वास सोडावा. यावेळी छातीचेही आकुंचन व्हायला हवे. हाताचे तळव. तसेच जोर देऊन मांड्यावर दाबावे व जोरजोराता खोटा श्वासोच्छ्वास करावा. (श्वासोच्छ्वास चे नुसते नाटक करावे) हवा फुप्फुसात जाताकामा नये. पोटाचे स्नायु शिथिल करा. पोटाचा पडदा आपोआपच वरच्या दिशेला जाऊन पोटात अंतर्वक्र पोकळी तयार होईल. यालाच उद्दीयान म्हणतात.
ऍक्युपंक्चर
ऍक्युपंक्चर पध्दती म्हणजे धातुच्या अतिशय बारीक सुया शरीरावर विशिष्ट ठिकाणी टोचण्याची पध्दत आहे. या पध्दतीने बरेच प्रकारच्या रोगावर व तक्रारीवर उपचार केला जातो. त्यापैकी दम्याच्या रोगावरही अधिक प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.
ऑरीक्युलो थेरपी
दम्यावर लाभदायक असलेली ऍक्युपंक्चरचीच ही एक पध्दत असून या उपचारासाठी प्रामुख्याने बाह्य कर्णाचा (कर्णाचा बाहेरील भाग) उपयोग केला जातो. चित्रात दर्शविल्याप्रमाणे बाह्य कर्णावरून फुप्फुसाचे प्रतिनिधीत्व करणार्या विशिष्ट ठिकाणी धातूची बारीक रींग टोचली जाते. ह्या रिंग ऐवजी धातुच्याच बनविलेल्या निडलचाही उपयोग करता येतो.
स्काल्प ऍक्युपंक्चर
यालाच हेड निडल थेरपी म्हणतात. या पध्दतीत कपाळाची मध्य रेषा नाकापासून सरळ अशी जाणारी व कपाळाने दोन भाग करणारी रेषा व भुवईच्या मध्यभागातून निघणारी उभी सरळ रेषा (जीस कपाळाच्या अर्ध्या भागाचे दोन समान भाग करते) यांच्यातील (दोनरेषेमधील) भागाच्या मध्यभागावर २ ते ३ निडल्स लावल्या जातात. या भागाला थोरॅसीक कॅव्हीटी एरीया म्हणतात. ह्या हेड निडल थेरपीनेही दम्याच्या रूग्णांना आराम पडत असल्याचे दिसून आले आहे.
धोती क्रिया
धोती क्रियेपैकी जलधौती, वमनधौती, क्रिया दम्याच्या रूग्णांना अधिक लाभदायक आहे.
जलधौती किंवा वमनधौती
रोज सकाळी ३ ते ४ पेले कोमट पाण्यात १ ते २ चहाच चमचे मीठ घालून ते सर्व पाणी प्यावे व नंतर ते उलटी करून बाहेर काढावे (वमम करावे.)
श्वासोच्छ्वासाचे व्यायाम प्रकार
- Details
- Hits: 8655
8
अस्थमा
हृदयविकार: तुम्हांला माहीत आहे का?
