सीटी स्कॅनची मुळ संकल्पना काय?
क्ष किरणांच्या सहाय्याने वा परिध्वनीलहरींच्या मदतीने पेशीजालांची तपासणी, एका पातळ किरणाने, अनेक कोनातून केली जाते. या पध्दतीत शरीरातील पातळ विभागातील पेशींची तपासणी होते.
हा झोत शरीरातून जात असताना प्रेषित झालेल्या उत्सर्गाची नोंद सलगपण योजलेल्या शोधकांकडे होते, ही शोधके संगणकाला जोडलेली असतात.
संगणक गणिती घातांकाच्या सहाय्याने पेशीजालाची प्रतिमा तयार करतो, त्यामुळे संपूर्ण शरीर हे विविध भागातील (पेशीरचनांच्या) प्रतिमांच्या पटात बघता येते. स्कॅनिंग करता सामान्यत: ३० ते ९० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात कोणतीही वेदना होत नाही. व्यक्तिला एक डाय (रंगाचे) इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे प्रतिमेतील विरोधाभास स्पष्ट होतो. म्हणून तपासणीपूर्वी ४ तास, व्यक्तीने काहीही खाऊ नये असे सांगितले जाते. या इंजेक्शनमुळे अंगात उष्णता वाढल्यासारखी वाटणे, तात्पुरती डोकेदुखी, चेहरा सुजलेला असणे, खारट चव येणे, मळमळणे आणि उलट्या असा त्रास होवू शकतो.
सीटी स्कॅन करताना, रूग्ण स्थिर अवस्थेत टेबलावर झोपून असतो. त्याने (तिने) दागिने वा अन्य काही धातू अंगावर असतील ते काढून ठेवावेत. ते टेबल बोगेदयासारख्या दिसणार्या सीटी स्कॅन यंत्रात सरकवले जाते, स्कॅनिंग होताना थोडीही हालचाल न करणे आवश्यक असते. तेथे श्वसनाला कोणताही अडथळा येत नाही. क्लॅकिंग आवाज करत स्कॅनर टेबलाभोवती फिरतो ही क्रिया चाल असताना व्यक्तीशी संपर्क ठेवलेला असतो, संवाद चालू असतो. जर व्यक्तीला खूप भीती वाटू लागली तर, प्रक्रिया कोणत्याही वेळी थांबवता येते. काही जणांना बंद जागेत राहण्याची भीती असते. अशा वेळी डॉक्टर चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ रूग्णांना सौम्य शामक औषधे देतात.
सीटी स्कॅनकरता आढळणारी सर्वसामान्य लक्षणे
शरीराचे कोणत्या भागाचे सीटी स्कॅन होते?
सी. टी. स्कॅनची पूर्वतयारी
- सी. टी. स्कॅन पूर्वी ३ ते ४ तास काहीही खाऊ नये. कॉट्रास्टचे इंजेक्शन दिले जाते.
- उदरासंबंधी वा कटीभागातील अवयवांसंबंधी स्कॅन करायचा असेल, तर स्कॅनिंगचे २० ते ३० मिनिटे अगोदर शौचाचे पारदर्शिकरण होणे गरजेचे असते. त्याकरता ७/८ सुगंधित ग्लास पेय दिले जाते. त्यात विरोधात्मक रसायने असतात.
- इतर स्कॅनमध्ये जिथे तोंडावाटे घेण्याची वा इंजेक्शन द्वारे घेण्याचे विरोधात्मक औषध द्यावे लागत नाही तेथे कोणतीही पूर्व तयारी लागत नाही.
- सी.टी. स्कॅन आवश्यक असणारे सर्वसामान्य विकारातील भाग मेंदू, मज्जारज्जू, मान व मेंदू वगळता डोके, स्नायू अस्थि संस्था (इन्टरव्हेन्शनल सी. टी. गाईडेड प्रोसिजर्स)
सी. टी. स्कॅनची मदत असल्याशिवाय करता न येण्यासारख्या प्रक्रिया.
शरीरातील कोणत्या भागाचे सी. टी. स्कॅन होते?
- डोके आणि मेंदू
- नाकाभोवतालचे भागातील भाग/कक्षा
- मस्तकाच्या बाजूला असलेली आत श्रवणेंद्रिय असलेली हाडे
- मान
- उदरपोकळी व कटीप्रदेश
- सर्व सांधे
- सर्व टोकाचे भाग (एक्सट्रीमिटीग)
सी.टी. स्कॅनचे दुष्परिणाम
- क्ष किरणांशी संपर्क
- विरोधाभासात्मक औषधांचे दुष्परिणाम काही रूग्णांना जाणवतात. पेन्सिल इतका पातळ, क्ष किरणाचा झोत वापरला गेला तरी शरीराच्या इतर भागात काही किरणोत्सर्गत पसरतो.
- सहसा गर्भवती स्त्रीयांची सी. टी. स्कॅन परिक्षा केली जात नाही. अतिशय अपरिहार्य असेल तरच ते केले जाते. अशावेळी किरणोत्सर्गापासून बचाव करण्याची पुरेशी खबरदारी घ्यावी लागते. सी. टी. स्कॅन झाल्य़ावर काही वेळ, रूग्णावर, उशीरा आलेल्या प्रतिक्रियेबाबत लक्ष ठेवावे लागते.
- व्यक्तीने शरीरातील डायचे उत्सर्जनासाठी भरपूर पेये घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेत पोटाचा सी. टी. स्कॅन करू नये.