जगात बहिरेपणाच्या त्रासाने त्रस्त झालेल्यांची संख्या काही कोटीच्या घरात आहे. काही लोकांना जन्मत: कमी ऐकायला येते, तर काहींना म्हातारपणी हा त्रास होतो, तर काहींना मध्यम वयात बहिरेपणा येतो. बहिरेपणा आला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो वाढल्यावर इलाजासाठी धाव घेतात.
हा आजार असलेले लोक दुसर्याशी बोलणे टाळतो, निराशा व कमीपण वाटत असल्याने समाजापासून दूर राहतो व परित्यक्त जीवन जगतो, कधी कधी हा मानसिक ताण इतका असह्य होतो की, त्याला रक्तदाबाचा विकार जडतो.
बहिरेपणाचे प्रकार
१. प्रवाही बहिरेपणा
२. मज्जातंतूचा बहिरेपणा
१. प्रवाही बहिरेपणा
हा प्रकार मध्य कर्णातील हाडे एकमेकांत घट्ट बसल्यामुळे होता. मध्यकर्णातील हाडे घट्ट बसल्यामुळे पडद्यावर आवाज आदळून कंपन आंतरकर्णापर्यंत नीट पोहचत नाही. त्यामुळे कमी कंपनाचे शब्द उदा. बाबा, मामा, दादा नीट ऐकू येत नाहीत. यावर माणसाची प्रकृती धडधकाट असल्यास ऑपरेशन शक्य आहे, नाहीतर श्रवणयंत्राने चांगला फायदा होतो.
२. मज्जातंतूचा बहिरेपणा
या प्रकारात वेसीलर मेसब्रेनच्या तंतूचा नाश होतो. निमुळत्या टोकावरील तंतू नष्ट झाल्यामुळे असा बहिरेपणा येतो. त्यामुळे क्ष, स, श, थ, फ आणि व या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द नीट ऐकू येत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे श्रवणयंत्र लावणे.
३. संमिश्र बहिरेपणा
संमिश्र बहिरेपणामुळे प्रवाही व मज्जातंतू असे दोन्ही प्रकारचे बहिरेपण असते. याला याशिवाय पुढील कारणांनी बहिरेपणा येतो.
- कर्णनलिका लहान असते
- कानात मळ साचणे
- कानाच्या पडद्याला भोक असणे
- कानातून पू येणे
- म्हातारपण
- तापात जास्त प्रमाणात अँटी - बायोटेक्स घेतल्यामुळे
- जन्मत: बहिरेपणा
- डोक्याला मार बसल्यामुळे
- सतत यंत्राची घरघर ऐकल्यामुळे
- तापाने येणारा बहिरेपण
- सर्दी झाल्यामुळे येणारा बहिरेपणा
श्रवणयंत्राचे सर्वसाधारणपणे चार प्रकार असतात.
- पॉकेट मॉडेल
- कानामागचे अदृष्य मॉडेल
- चष्म्याच्या दांडीत असते
- कानातील मॉडेल (आय.टी.सी.) अत्यंत लहान व अदृष्य
मशीन लावल्यावर शेकडा ८० टक्के लोकांना ताबडतोब चांगले ऐकू येते. उरलेल्या २० टक्के लोकांना थोडे जास्त दिवस लागतात.