तोंडाच्या भागांची स्व-तपासणी
अति धोक्याचे घटक
तंबाखूचा वापर (पान, पान मसाला, गुटखा, मिश्री, चुना, तंबाखूची गोळी) धूम्रपान (सिगारेट, बिड्या, सिगार, चिरूट, चिलीम, हुक्का, गुडगुडी इ.) अति मद्यापानामुळे जेवण कमी घेणे आणी तोंडाची अस्वच्छता राखणे तंबाखू खाण्याच्या व्यसनाबरोबरच मद्यपानाचे व्यसन असल्यास अशा लोकांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचा धोका दुप्पट किंवा अधिकच संभवतो.
तोंडामध्ये वारंवार इन्फिक्शन होणं, चट्टे पडणं, व्रण उठणं आणी त्याकडे दुर्लक्ष होऊन त्यासाठी कुठलेच इलाज न केले जाणं. टोकदार दात किंवा व्यवस्थित न बसणार्या दातांच्या कवळ्यांमुळे हिरड्यांना वारंवार दुखापत - इजा होणं आणी ती लवकर बरी न होणं अति गरम, अति जहाल तिखट किंवा अति मसालेदार पदार्थ वारंवार खाण.
धोक्याची सूचना
- तोंडाच्या आत वारंवार येणारे पांढरे किंवा तांबडे चट्टे.
- तोंडाच्या कुठल्याही भागावर झालेला व्रण किंवा जखम - १५ दिवसांपेक्षा अधिक काळ बरी न झाल्यास.
- खालील गोष्टींचा त्रास होणे.
- अ. तोंड पूर्ण उघडायला अडचण (सामान्यत: तोंड ५ ते ६ सेंटीमिटर उघडते).
- ब. बोलतांना त्रास होणे.
- क. चावतांना - चघळतांना त्रास.
- ड. अन्न, पाणी, आवंढा गिळताना कष्ट होणे.
- जिभेची मर्यादित हालचाल.
जीभेच्या पृष्ठभागावरील काहीही बदल. - जीभ सरळ बाहेर न येता, वाकडी येणे.
- कानात काहीही दोष नसताना तोंडापासूनच्या त्रासामुळे कान दुखणे.
वरील गोष्टी टाळण्यासाठी काही उपयुक्त सूचना
- शक्य असेल तर तंबाखूचे व्यसन सोडून द्या.
- तोंडाच्या सगळ्या भागांची उत्तम स्वच्छता राखा.
- खळखळून चूळा भरून तोंड धुण्याची आणि योग्यरीत्या दात घासण्याची संवय जडवून घ्या (विशिषत: निजण्यापूर्वी).
काही संरक्षणात्मक उपायही अवश्य करा
आठवड्यातून एकदा तोंडाच्या सगळ्या भागांची काळजीपूर्वक पाहणी करा तीन महिन्यांनी एकदा तज्ञांनकडून तोंडाची तपासणी करून घ्या. झोपतांना कधीही तोंडात पान, सुपारी किंवा तंबाखू ठेवू नका. दिवसातून जितके वेळा तंबाखूचा वापर कराल, तितक्याच वेळा खळखळून चुळा भरून तुमचं तोंड स्वच्छ करा.
तोंडाची स्व - तपासणी कशी करावयाची
कोणत्याही लहान आरसा घ्या आणि एक चमचा. संपूर्ण तोंडाची आतून सामान्य तपासणी करा, आणि ज्या भांगावर कॅन्सरची भीती अधिक आहे, तो भाग विशिष काळजीपूर्वक तपासा.
या गोष्टी अवश्य आणि लक्षपूर्वक बघा
धोक्याच्या सूचना व्यक्त करणारे एखादे लक्षण जिभेची हालचाल तोंड उघडण्याची क्रिया या बाबींकडे विशिषत्वानं लक्ष पुरवा.
तुम्ही डावखोरे असाल तर तोंडाचा उजवा भाग आणि जिभेचा उजवा भाग अधिक दक्षतेने तपासा. उजवा हात कामाला वापरीत असाल, तर तोंडाच्या डाव्या बाजूंवर जास्त लक्ष केंद्रित करा. कोणत्याही खूणा स्वतपासणीत आढळल्या तर ताबडतोब डॉक्टरकडे जा.